Type Here to Get Search Results !

भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !

वणी, शुभम कडू : 

                           निवडणुकांचे पडघम वाजू लागताच अनेक राजकिय उलथापालत व्हायला सुरूवात झाली आहे.  विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा मनसेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीची पाया भक्कम करणारा आहे. आज तालुक्यातील पिंपरी (कोलार) येथील भाजपा आणि शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. विवीध समाजकिय उपक्रमात मनसेची असलेली आघाडी आणि पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या लोकप्रियतेने अनेक युवक मनसेत डेरे दाखल होत आहेत. शहरातली शिवमुद्रा या जनसंपर्क कार्यालयात आज तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात भाजपा आणि शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करत मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. यात प्रवीण मांडवकर, सुरज लोडे, रुपेश बोंडेड, विनोद वाभिटकर,यशवंत ढोके, विकास बोंडे, किसन सिडाम,गणेश ढोके, पंढरी जुनधरी, नितीन कुरेकार, मनोज मानूसमारे, नितीन बोंडे, पांडुरंग सिडाम, सुधाकर मडावी या प्रमुख मंडळीस असंख्य युवकांचा सामावेश आहे..यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी पक्षात स्वागत करत अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि राजु उंबरकर यांचे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य निश्चितपणे करतील असा विश्वास गोहोकार यांनी व्यक्त केला. प्रसंगी पक्षाचे राजु काळे, गोवर्धन पिदुरकर महादेव पेटकर,मिन्नाथ गिरडकर, गोकुल पारखी, निलेश द्याहारकर,सूरज काकडे यांच्या सह तालुका व शहर कार्यकारणी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
  1. ह्या कार्यकर्त्यांनी....समाजसेवक यांनी कोणत्या गावाचे भले केले.... ते आपल्या द्वारे ..... समोर आणा..

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad