Type Here to Get Search Results !

रोडवर ज्वाळांची तांडव — कार जळून राख, वणीतील नागरिक चकित!

वणी :

            वणी–यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात शनिवारी रात्री १० वाजता धावत्या फिएट लीनिया कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच कार ज्वाळांनी वेढली आणि पूर्णतः खाक झाली. प्रसंगावधान राखत चालक वेळेवर बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. 

            घटनेची माहिती मिळताच वणी नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad