वणी :
शहर व परिसरातील जनतेच्या दीर्घकालीन नागरी समस्यांवर तोडगा निघावा आणि प्रशासनाची निष्क्रियता संपावी, यासाठी यवतमाळचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजता श्री विनायक मंगल कार्यालय, वणी येथे पार पडणार आहे.
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय कारभारामुळे नागरिकांच्या तक्रारी फक्त फाईलपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. अधिकारी निर्णयक्षमतेचा अभाव दाखवत असल्याने सामान्य नागरिकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आता थेट मैदानात उतरत आहे.
“हा दरबार फक्त ऐकण्यासाठी नाही, तर निर्णय आणि निवारण देण्यासाठी आहे!” असे जाहीर आव्हान देत शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी सांगितले की, “शासन-प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून शिवसेना कार्यरत आहे. जनतेचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे.”
दरबारानंतर दुपारी ३ ते ५ वाजता भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, शेकडो तरुण, महिला, शेतकरी आणि व्यापारी शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश करणार आहेत. वणीमध्ये या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेनेचा दरबार – निर्णयाचा, निवारणाचा आणि जनतेच्या आवाजाचा!


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या