आगामी वणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल येथे काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड देविदास काळे यांच्या अध्यक्षतेखाली व संजय खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वणी नगर पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती भविष्यात जोमाने आणि एकजुटीने निवडणूक लढण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच नगरपालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.
बैठकीत राकेश खुराणा, प्रदीप बोनगिरवार, जयसिंग गोहोकर, डॉ. महेंद्र लोढा, झिया अहेमद, सुरेश रायपुरे, शामाताई तोटावार, वंदनाताई आवारी, प्रमोद निकुरे, प्रमोद लोणारे इत्यादीं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. योग्य रणनिती आखल्यास विजयश्री कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सततच्या भूलथापा व जातीय, धार्मिक राजकारणामुळे भाजपचे खरे रुप जनतेला कळले आहे. काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा विचार असल्याने यंदा काँग्रेसला अनुकूल परिस्थीती आहे, असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात ऍड देविदास काळे म्हणाले की अद्याप वरिष्ठ पातळीवर आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवावी, आपली ताकद जनतेच्या विश्वासात आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन काँग्रेसचा विचार, विकासाची भूमिका आणि सर्वसमावेशकतेचा संदेश पोहोचवावा. जनता परिवर्तनासाठी तयार आहे. जर एकजुटीने काँग्रेस लढली तर विजय पक्का असल्याचेही सुतोवाच त्यांनी केले.
बैठकीत विकेश पानघाटे, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवारी, अशोक पांडे, राजू अंकीतवार, ओम ठाकूर, जय आबड, मंदा बांगरे, संगीता मांढरे, काजल शेख, सुरेखा वडीचार, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, माजी नगराध्यक्ष आशा टोंगे, ॲड सूरज महातळे, निलिमा काळे, भास्कर गोरे, राजाभाऊ बिलोरिया, सुरेश बन्सोड, उत्तम गेडाम सीमा कुमरे, गजेंद्र भोयर, प्रफुल्ल वाळके, अनंता डंभारे, माला मेश्राम, रेखा चिकणकर, रसूल रंगरेज, इत्यादी मान्यवरांसह नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या महिला उमेदवारांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांनी आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात आपले विचार मांडले. मांडलेल्या सूचनेवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे बैठकीत ठरले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या