Type Here to Get Search Results !

डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांचा शिवसेना उबाठात प्रवेश

वणी - 

                  शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यां संचिता विजय नगराळे यांनी आज बुधवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या घरी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष पदाचा विजय खेचून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

            यावेळी बोलताना आ. संजय देरकर म्हणाले की डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश हा आमच्या पक्षासाठी एक महत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. त्या एक यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ असण्याबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एक ध्येयवादी कार्यकर्त्या आहेत. मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि शब्द देतो की, त्यांच्या प्रत्येक उपक्रमांना पक्षा तर्फे पूर्ण पाठबळ देण्यात येईल.


    📌 डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांचा परिचय 

                   वणी तालुक्यातील खांदला या छोट्याशा गावात जन्मलेल्या डॉ. संचिता नगराळे यांचे बालपण सुशिक्षित आणि सुसंस्कारित कुटुंबात गेले. वडील दयालाल अरके हे शिक्षक, तर आई अंगणवाडी सेविका होत्या. डॉ. संचिता, यांना आजोबांनी दत्तक घेतल्यामुळे त्यांचे शिक्षण संचिता गुलाबराव गेडाम या नावाने झाले. आंबेडकरी व बहुजनवादी चळवळीतील कार्यकर्ते, व्यावसायिक विजय नगराळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एक कुशल स्त्रीरोगतज्ज्ञ अशी त्यांची परिसरात ओळख आहे. यासह त्या सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात. विविध आरोग्यविषयक, महिला सक्षमीकरण उपक्रम त्यांनी परिसरात राबवले आहे. एक दमदार व्यक्तिमत्त्व त्यांच्या माध्यमातून वणीकर जनतेला मिळते आहे 

           पक्ष प्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख संजय निखाडे, महिला जिल्हा प्रमुख योगिता मोहळ, पुष्पा ताई भोगेकर, किरणताई देरकर उपजिल्हा संघटक डिमनताई टोंगे, गीताताई उपरे,उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, शरद ठाकरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, वणी तालुका प्रमुख संतोष कूचनकार, महिला तालुका प्रमुख सुरेखाताई ढेंगळे, शहर प्रमुख विनोद ढूमणे, शहर संपर्क प्रमुख राजू तुरणकर, शहर संघटक मनीष बत्रा, शहर सचिव अजय चन्ने, जिल्हा संघटक गणपत लेडांगे, प्रकाश खरात, गोपी पुरावार, डॉ. विलास बोबडे, यांच्या सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. 

          डॉ. संचिता यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे. डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांच्या रूपाने शिवसेना (उबाठा) पक्षाला एक शिक्षणप्रेमी, सेवाभावी आणि कार्यतत्पर नेतृत्व लाभले आहे. जनतेच्या समस्या जाणणाऱ्या आणि त्यांच्या निराकरणासाठी तत्पर असलेल्या अशा व्यक्तिमत्त्वामुळे पक्षला बळकटी मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad