Type Here to Get Search Results !

शिवसेना (उबाठा) मध्ये जोरदार इनकमिंग, आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात


 वणी - 

           आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) मध्ये शेकडो कार्यकर्त्यानी प्रवेश केला. बुधवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी भालर वसाहत, नायगाव (बु.), बोरगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांने शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षप्रवेश केला. आ. संजय देरकर यांच्या घरी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विजय खेचून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 
                                सध्या शिवसेना (उ.बा.ठा) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत आहे. याचाच एक भाग म्हणून उप जिल्हा समन्वयक सहकार सेना संजय देठे, प्रफुल्ल बदखल, अक्षय लांडे यांच्या नेतृत्वात व युवा सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे यांच्या समन्वयातून नांदेपेरा-वेल्हाळा या गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार संजय देरकर यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी देरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

📌 शिवसेनेचा भगवा फडकणार :- 
                    शिवसेना (उबाठा) हा केवळ पक्ष नाही तर जनतेचा विश्वास आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पष्ट झाले आहे की जनतेला विकास, पारदर्शकता आणि निष्ठेचे नेतृत्व हवे आहे. कार्यकर्त्यांची अशीच साथ मिळाली तर आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकणार आहे.
                      — संजय देरकर, आमदार वणी विधानसभा मतदारसंघ

              यावेळी भालर वसाहत येथील रितेश मत्ते, नवरतन भावरकर, राम सिंग, रोहित येवले, रोहित मत्ते, मोहित गौतम, उनेर शेख, प्रवीण गायकवाड, सहयोग नांदे, पवन डाहुले, प्रफुल्ल डावरे, आशिष विधाते, भाविक लोडे, भूषण टोंगे, बंडू बोबडे, अमोल तोडासे तर नायगाव (बु) येथील पवन इखारे, सक्षम चोपणे, रवींद्र डाहुले, वैभव देठे, निशांत तुराणकर, गजानन चोपणे, अंकुश देठे, आशुतोष तुराणकर तसेच बोरगाव येथील ओंकार खोकले, श्रीकांत करपते, चेतन बोधे, राम बदखल, कुणाल चिंचोलकर, लक्ष्मण दोडके इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad