Type Here to Get Search Results !

“विवाहित महिलांच्या विकृत आकर्षणाने वणी रक्तबंबाळ! — प्रेमात अडथळे ठरणाऱ्या पतींचा खून, पोलिसांचा फज्जा!”


 वणी : 

          वणी तालुका आज वासनांधतेच्या, विश्वासघाताच्या आणि रक्ताच्या खेळात बुडालेला दिसतो आहे. विवाहित महिलांच्या अनैतिक संबंधांमुळे संपूर्ण परिसरात हत्याकांडांची मालिका सुरू झाली आहे. सलग तीन भयंकर खून — आणि प्रत्येकाच्या मुळाशी ‘विवाहित महिलेचे परपुरुषाशी संबंध’.
                   ही मालिका केवळ अनैतिकतेची नाही, तर पोलिसांच्या निष्क्रियतेची उघडपणे खिल्ली उडवणारी आहे. वणी पोलीस ठाणे झोपेत आहे, आणि गुन्हेगार निर्भयपणे खेळ मांडत आहेत!

📌  “दारू पाज, आणि जीव घे!” — प्रेमाच्या नशेत रचला रक्तरंजित कट!

                       रंगनाथ नगरातील स्वप्नील राऊत (२६) याचा खून पोलिसांच्या नाकाखाली झाला. पत्नीचे अनैतिक संबंध आरोपी सुमेश टेकाम (२४) याच्याशी होते. या विकृत संबंधांत अडसर ठरत असलेल्या स्वप्नीलला दोघांनी दारू पाजून जंगलात नेलं, आणि निर्दयपणे ठेचून ठार मारलं. दारूच्या नशेत माणसाला फसवून त्याचा गळा चिरला  आणि पोलिसांना काहीच खबर नाही! हा खून नाही, ही पोलिस यंत्रणेची उघडी लाज आहे!

📌  पत्नीच्या संबंधाचा ‘शेवटचा हिशोब’ — पाण्याच्या टाकीत शव!

               वागदरा येथील मनोज वानखेडेचाही शेवट तसाच  पत्नीच्या परपुरुषाशी असलेल्या संबंधांमुळे. आरोपी वाजिद हुसैन व त्याच्या टोळीने मनोजचा खून करून त्याचे शरीर दगड बांधून पाण्यात फेकले. प्रेमाच्या नशेने झपाटलेले हे राक्षस कायद्याची पर्वा न करता हत्या करतायत…


📌 “बायको पळवली, बाप ठार!” — सूडाच्या ज्वालेने पेटलेला बेलोरा फाटा!

                   ६ ऑक्टोबरला बेलोरा फाट्यावर घडलेली घटना तर माणुसकीलाही काळीमा फासणारी. एका विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या सूडातून तिच्या नवऱ्याने त्या तरुणाच्या वृद्ध वडिलांचा दगडाने ठेचून खून केला.


📌 वणी पोलीस ठाणं: गुन्हे थांबवण्यात शून्य, कबुलीजबाब घेण्यात हिरो!

                         या सलग घटनांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे , वणी पोलीस प्रशासन “प्रतिक्रिया देतं”, प्रतिबंध करत नाही! गुन्हा झाल्यानंतर धाव घेणं म्हणजे कायदा राखणं नाही, ते ‘शोकसंदेशाची वाट बघणं’ आहे! दारू, मोबाईल, आणि अनैतिक संबंध यांच्या दलदलीत समाज बुडतोय — आणि पोलिस फक्त प्रेस नोट काढतात.

📌  वणीला पुन्हा कायदा हवा की रक्तपात ?

                   वणी तालुक्यातील नागरिक प्रचंड संतापले आहेत. त्यांचा सवाल सरळ आहे  “प्रत्येक खुनामागे विवाहित महिलांचे अनैतिक संबंध आहेत… मग        अशा विकृतींवर अंकुश घालण्यासाठी पोलिसांची कोणती कारवाई?

           विवाहित महिलांच्या अनैतिक संबंधांतून उभ्या राहणाऱ्या या रक्ताच्या नात्यांनी समाजात भीतीचं सावट निर्माण केलं आहे. वणीकर आज विचारतोय “पोलीस प्रशासन जागं होईल तेव्हा आणखी किती बळी पडलेले असतील?”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad