Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यात मनसेत इनकमिंग, अनेक नागरिकांचा राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

वणी :

              आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असताना, मारेगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज (दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५) मोठा पक्षप्रवेश झाला. मारेगाव तालुक्यातील बुऱ्हांडा, सराटी आणि हटवांजरी येथील अनेक नागरिकांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते मनसे जनसंपर्क कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
                     सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने सर्वच राजकीय पक्ष आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे आणि स्थानिक नेते सुरज नागोसे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश पार पडला.
                      बुऱ्हांडा, सराटी आणि हटवांजरी या गावांमधील खालील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला. यात स्वप्नील सुरपाम, तुषार गोरे,अक्षय मते,निखिल खीरटकर,संदीप काकडे,सुमित भरणे, बिल्लू रामगडे,ज्ञानेश्वर झाडे,दत्ता बावणे, पुनाजी कुमरे यांनी पक्ष प्रवेश केला. या प्रवेशामुळे मनसेची स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची फळी मजबूत झाली आहे.
                  यावेळी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी पक्षात आलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.उंबरकर यांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेतून, आगामी निवडणुकांमध्ये मनसे स्थानिक प्रश्नांवर मुद्द्यांवर अधिक आक्रमकपणे लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकूणच, मारेगाव तालुक्यातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेची दावेदारी आणखी मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
            यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका उपाध्यक्ष सूरज नागोसे, रुग्ण सेवा केंद्र अध्यक्ष अनिस सलाट, शहराध्यक्ष अंकुश बोढे, शंकर पिंपळकर, लक्की सोमकुंवर, कृष्णा निमसटकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad