आज जम्मू भाई यांच्या जन्मदिनानिमित्त सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन
0
वणी, शुभम कडू : शहरातील प्रसिद्ध आमेर बिल्डर अँड डेव्हलपर कडून जमीर खान (जम्मूभाई) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशियाना हॉल, मोमीनपुरा, वणी येथे आज दि. ३० डिसेंबर रोज शनिवारला सकाळी ११ वाजता मुस्लिम वधू-वरांचे २१ जोडप्यांचे 'निकाह' आयोजित करण्यात आले आहेत.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अध्यक्ष वफ्फ बोर्ड आ. डॉ. वजाहत मिर्जा, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, मनसे नेते राजु उंबरकर, अध्यक्ष, वणी नागरी सह. बँकेचे अध्यक्ष संजय देरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्ड, भाजपा प्रदेश सदस्य विजय चोरडीया, आम आदमी पार्टीचे नेते भाई अमन, अध्यक्ष व्यापारी असोसीएशनचे राकेश खुराणा, अध्यक्ष रंगनाथ स्वामी नागरी सह पत संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवीदास काळे, फारुख हारुण चिनी, रवि बेलूरकर सर्व उपस्थित राहणार आहे. या यशस्वितेसाठी जमीर खान ऊर्फ जम्मुभाई, हाजी रफिक शेख ईब्राहीम, रज्जाक पठाण, हाजी असलम चिनी, मो. एजाजभाई, बबलू दिवाणजी, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खाँ शाबान खाँ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शाहीद शमशेर खॉन, सैय्यद मतीनभाई, डॉ. शाह अरशद ईकबाल, डॉ. सैय्यद अतीक, अशफाक खॉ. मेहबुब खाँ, अनवर हयाती, मुन्ना खॉन, साकीब ईकबाल खान यांच्यासह समाजबांधव परिश्रम घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या