बहुचर्चित व बहुप्रतिक्षित तलाठी भरतीचा निकाल तत्काळ लावून उमेदवारांना नियुक्त्या द्याव्या - संभाजी ब्रिगेड
SK News Channel0
वणी, शुभम कडू : सरकारने मोठा गाजावाजा करून मागील पाच वर्षांपासून पहिल्यांदा घेतलेल्या तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यास यंत्रणेकडून दिरंगाई होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.या भरतीच्या संबंधाने ठरवून दिल्या प्रमाणे १६डिसेंबर पर्यंत गुणवत्ता यादी आणि २६ जाणे २०२४ ला मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते नियुक्ती देणे अपेक्षित होते मात्र सरकार कडून ठरलेल्या वेळापत्रक नुसार कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
येत्या आठवड्यात निकाल जाहीर करून नियुक्त्या न केल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने परीक्षार्थीना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असा इशारा संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्ह्याचा वतीने देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे ॲड.अमोल टोगे,ॲड. अनिरुद्ध तपासे, आशिष रींगोले,निलेश गोवारदिपे, दत्ता डोहे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या