Type Here to Get Search Results !

तिरळे कुणबी विद्यार्थी गौरव सोहळा व समाज मेळावा संपन्न

वणी, शुभम कडू : वणी तालुका तिरळे कुणबी समाज संघटनेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यात आर्या चौधरी, ऋतुजा भेले, आर्या सुके, परिनिता ठाकरे, खुशी झाडे, श्रुतिका गाभोळे, अंशु गोहणे, गणेश भोयर, पार्थ चौधरी (फुटबॉल पटू) दिव्यांणी राऊत, गार्गी गायकवाड, आराध्या चौधरी (शिष्वृत्ती परीक्षा) यांचा समावेश आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर स्वकष्टाने मात करून यश प्राप्त करणारे उद्योजक महेश गायकवाड यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव काळे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून वैभव ठाकरे (संचालक, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, वणी) समाज भूषण महेश गायकवाड,अतिथी म्हनुन शालिनीताई रासेकर माजी नगराध्यक्ष, प्रमोदभाऊ इंगोले अध्यक्ष नृसिंह व्यायाम शाळा वणी, ऐडव्होकेट निलेश चौधरी , कार्तिक देवडे अध्यक्ष तिरळे कुणबी समाज वणी उपस्थित होते. विशाखा चौधरी व किरण गोडे यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.'हवे सोबत तोंड फिरवणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नव्हे,तर वादळातही ठामपणे पाय रोऊन आपल्या ध्येय्याशी ईमान राखून झटणारी खरी संघटना होय. ती काळानुरूप मोठी होत नाव लौकिकास आली तर कार्यकर्त्यांचेही नाव होते, म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्व अनन्य साधारण आहे',असे प्रतिपादन वसंतराव काळे यांनी केले.

      कार्यक्रमाचे संचालन ग्राम गीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. प्रास्ताविक अशोक चौधरी तर आभार प्रदर्शन प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले. समाज मेळाव्याच्या यशस्वितेसाठी तिरळे कुणबी समाज तालुका वणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

     यावेळी समाजातील ज्येष्ठ सदस्य सर्वश्री प्राध्यापक रामरावजी काळे, नारायणराव देवडे, डॉ. मोरेश्वर महाजन, डॉ.शांतारामजी ठाकरे, प्रमोद राव काळे, सुरेंद्रजी इंगोले, विजयराव ढाले, भालचंद्रजी इंगोले,अनीलराव ढाले, प्रविणराव इंगोले, शरदराव इंगळे आदी मान्यवर, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad