वणी/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते गजानन विधाते यांची भाजपा तालुका अध्यक्षपदी परत दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांनी मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात अतिशय चांगले काम केल्यामुळे त्यांची तालुका अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. गजानन विधाते हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून विद्यार्थी जीवनात त्यांनी सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये 2003 पासून शहर सरचिटणीस, तालुका अध्यक्ष म्हणून दोन कार्यकाळात काम केल्यानंतर त्यांना भाजपाचे वणी तालुका सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तालुका भाजपाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली. पक्ष श्रेष्ठीनी टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवित. मागील तीन वर्षांमध्ये तालुक्यातील सहकार क्षेत्र, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
त्यामुळेच केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी विधाते यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाचे तालुक्यातील नेतृत्व करण्यासाठी तालुका अध्यक्ष पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात टाकून मोठा विश्वास दाखविला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या