वणी :
वणी नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणात आज शिंदे गटाची रॅली जितकी विराट, तितकीच स्फोटक ठरली. पण रॅलीचा खरा धडाका ठरला—महिलांचा आणि तरुणींचा जबरदस्त, आक्रमक सहभाग! संपूर्ण रॅलीत महिलांचे नेतृत्व, टाळ्यांचा कडकडाट, घोषणा आणि तुफान ऊर्जा यांनी वातावरण अक्षरशः पेटवून टाकलं.
ॲड. कुणाल चोरडिया आणि विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखालील रॅलीला आज महिलांनीच उर्जा दिली. साडी नेसलेल्या मातृशक्तीपासून तरुणींच्या उत्साहातले घोषवाक्यांपर्यंत—सगळीकडे एकच सूर… “वणी नगर परिषदेवर धनुष्यबाणच!”
रॅलीच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत महिलांचा सहभाग इतका प्रचंड होता की पुरुष कार्यकर्तेही थक्क झाले. हातात भगवे झेंडे, डोक्यावर शिंदे गटाचे फेटे, आणि घोषणांचा आवाज इतका आक्रमक होता की संपूर्ण शहरात एकच संदेश गेला —
“यंदाची लढाई महिलांचीही, आणि विजयाचीही!”
महिलांच्या रांगा किलोमीटरभर वाढत होत्या. तरुणी घोषणांची हुकमी साथ देत होत्या. अनेक महिला प्रथमच रॅलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उतरल्या, आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकच आत्मविश्वास —“वणी बदलणार, नेतृत्व धनुष्यबाणाचं ठरणार!”
कार्यकर्त्यांच्या मोटरसायकलींचे ताफे, महिलांचा उत्साह, तरुणींची उग्र घोषणा आणि चोरडिया बंधूंच्या नेतृत्वाची घणाघाती गर्जना मिळून आजची रॅली वणीच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणून नोंदवली जात आहे.
आता वणीमध्ये एकच चर्चा—
महिलांनीही आज स्पष्ट संदेश दिला…
वणी नगर परिषदेत धनुष्यबाण फडकवण्याचा मार्ग आता जोरात मोकळा होत आहे!
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या