रोड शोमधील प्रचंड प्रतिसादानंतर झालेल्या सभेत महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण आणखीच भारावले. त्यांच्या जोशपूर्ण, धारदार आणि थेट मुद्द्यावर प्रहार करणाऱ्या भाषणाने संपूर्ण वणी अक्षरशः दणाणून गेली.
शहराच्या विकासाबाबत त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत वणीला विकासाचा नवा वेग देण्याची हमी दिली. विशेषत: शासकीय जागांवर राहणाऱ्या नागरिकांना पट्टे देण्याच्या महत्त्वपूर्ण घोषणेने सभेत प्रचंड जल्लोष उसळला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्येवर सरकारने निर्णायक पाऊल उचलणार असल्याचा संदेश मिळताच लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओतप्रोत दिसत होता. ही घोषणा विरोधकांसाठी स्पष्ट इशारा ठरली—वणी बदलाच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पिदूरकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, अंकुश बोढे, तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, मीराताई पोतराजे, शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी आदींची प्रभावी उपस्थिती होती. पदाधिकारी–कार्यकर्त्यांची गर्दी इतकी प्रचंड होती की सभास्थळी जनता–लाटच उसळली होती.






टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या