Type Here to Get Search Results !

“आज वणीकरांची परीक्षा — मतपेटीतूनच बदलेल शहराचे भवितव्य!”

वणी :

            आज दि. २ डिसेंबर २०२५, मतदान! पण अजूनही काही नागरिक “काय फरक पडतो?” अशा उदासीन वृत्तीने घरी बसण्याचा विचार करत असतील—तर हा विचार बदलण्याची आज वेळ आहे.
         शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले, पाणीपुरवठा अडखळला, स्वच्छतेचे तीनतेरा वाजले, आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून लोक कंटाळले… या सगळ्याला जबाबदार कोण? आपणच. कारण आपणच मतदान करत नाही, आणि नंतर पाच वर्षे तक्रारींचा पाऊस पाडत बसतो.

        आज होणारे मतदान हे निवडणूक नाही—शहराचे भविष्य हातात घेण्याची अंतिम परीक्षा आहे. मतदान न करणाऱ्यांनी पुढील पाच वर्षे कुठल्याही समस्येबद्दल तोंड उघडण्याचा नैतिक अधिकारही ठेवू नये, असा नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. प्रशासनाने सर्व व्यवस्था केल्या आहेत. सुरक्षा, सुविधा, दिव्यांगांसाठी व्यवस्था—सगळं तयार. आता फक्त नागरिकांची जबाबदारी बाकी.


      निवडणुकीतून निवडले जाणारे नेतृत्व ठरवणार आहे की—

▪️वणीला चांगले रस्ते मिळतील की खड्ड्यांचा महामेळा सुरूच राहील.
▪️पाणी नियोजन होईल की नागरिकांनी दररोज टँकरच्या मागे धावायचे
▪️शहर स्वच्छ होईल की कचऱ्याच्या ढिगांनी वणीचे स्वागत करायचे
▪️ लोकशाहीत सर्वात मोठा आक्रमक वार म्हणजे मत!
▪️ मत न टाकणे म्हणजे आपल्या शहराविरुद्धचा वार.

          युवकांनी तर स्पष्ट भूमिका घेतली आहे—
“आज मतदान नाही, तर उद्यापासून तक्रारही नाही!” आता प्रत्येक घरी, प्रत्येक कुटुंबात एकच संदेश गाजतोय, २ डिसेंबर—मतदानाचा दिवस, बहाण्यांचा नाही.

         वणी शहराचा आवाज होण्यासाठी, आणि बदलाच्या लढाईत सामील होण्यासाठी उद्या मतदान केंद्रावर जा. नाहीतर पुढील पाच वर्षे असंतोष सहन करण्याची तयारी ठेवा! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad