केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्थिर, निर्णायक आणि एकहाती सरकार असताना देशभरात विकासाचा वेग झपाट्याने वाढला. राष्ट्रीय महामार्ग, डिजिटल क्रांती, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अशा महत्त्वाच्या योजनांना गती मिळाली. भाजपकडे निर्णयक्षमता, स्थिर नेतृत्व आणि निधी पुरवठ्याची हमी असल्याने कोणतीही योजना अडथळ्यात अडकली नाही, असा दावा पक्षकडून केला जात आहे.
राज्यात देखील भाजपा-महायुती सरकारामुळे ‘डबल इंजिन’ विकास गतीने पुढे जात आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांना निधी, मंजुरी आणि धोरणात्मक पाठबळ मिळाले आहे. वणीतील विकासकामांमध्ये संजीवरेड्डी बोदकुरवार आणि तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले असून हे केंद्र–राज्य–स्थानीय एकविचाराचं शासन असल्यामुळे शक्य झाले.
नगरपालिकेत विविध पक्षांमुळे विकासाची गती मंदावते, निधी उशिरा मिळतो आणि शहराच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वणीचा खरा विकास करण्यासाठी अध्यक्षापासून ते नगरसेवकांपर्यंत एकाच विचाराचे आणि एकाच पक्षाचे नेतृत्व आवश्यक आहे, असे भाजपकडून स्पष्ट मत आहे.
ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, “विकासाची गती हवी असेल तर फक्त ‘कमळ’ निवडा. भाजपच शहरासाठी स्थिरता, पारदर्शक सुशासन आणि विकास देऊ शकते.”
नगरपरिषद निवडणुकीत भाजपने एकविचाराचे प्रशासन तयार करून वणीतील विकासाचा मार्ग अधिक वेगवान करण्यासाठी अंतिम फेरीत प्रचाराचे पंख पसरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या