Type Here to Get Search Results !

वणी नगरपरिषदेत शिवसेना विजयी ? जनतेचा कौल चोरडिया यांच्या बाजूने

वणी :
            वणी नगरपरिषद निवडणूक चुरशीला पोहोचत असताना, शहरभरात शिवसेना उभारत असलेली अभूतपूर्व लाट आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. एडवोकेट कुणाल चोरडिया यांच्या दमदार नेतृत्वात प्रत्येक प्रभागातून निघणाऱ्या प्रचार रॅलींना जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

         प्रत्येक प्रभागातील जनसंवाद दौरा, घराघरातील भेटीगाठी आणि रॅलींमधील प्रचंड जनसमुदाय यामुळे वणीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिलांचा आणि युवकांचा वाढता सहभाग, तसेच व्यावसायिक वर्गाकडून मिळत असलेला पाठिंबा — या सर्वांचा केंद्रबिंदू ठरत आहे कुणाल चोरडिया यांचे नेतृत्व.

        शहरभर एकच चर्चा रंगत आहे — “या वेळी वणीत शिवसेनेचा झेंडा नक्की फडकणार!”
      कुणाल चोरडिया यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे विरोधकांची चलबिचल वाढली असून, त्यांच्यात स्पष्ट धसका निर्माण झाल्याचे चित्र उभे राहत आहे.

       शिवसेनेच्या रॅलींमध्ये घुमणारे घोषवाक्य —
           “कुणाल चोरडिया पुढे चला, वणी तुमच्या पाठीशी आहे!”
— यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे.

            पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, वणी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय खेचून आणण्याची पूर्ण चिन्हे आता दृग्गोचर होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad