Type Here to Get Search Results !

प्रभाग १३ मध्ये भाजपाची आक्रमक लाट; भेदोडकर–चापडे ‘फिक्स नगरसेवक’ म्हणून जनतेची घोषणा

वणी :
            नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय वातावरण तापले असून उमेदवार ललिता भेदोडकर आणि राजू चापडे यांना मिळत असलेला तुफानी प्रतिसाद पाहता नागरिकांनी ‘फिक्स नगरसेवक’ म्हणून त्यांची उघड घोषणा सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारदौऱ्यांमध्ये या उमेदवारांना मिळणारा लोकस्फोटक पाठिंबा विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

            प्रभागातील रस्त्यापासून गल्लीपर्यंत एकच आवाज उमटताना दिसत आहे,—“भेदोडकर–चापडे यांनाच संधी, विकासाचा एकच मार्ग!” घराघरातील भेटी, थेट संवाद आणि महिलांशी व युवकांशी संवादांमुळे या जोडीबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये भेदोडकर यांच्याबद्दल आणि युवकांमध्ये राजू चापडे यांच्याबद्दल असलेला उत्साह सभांमधील गर्दीत स्पष्टपणे जाणवत आहे.

               या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही स्वतः उमेदवार भेदोडकर–चापडे यांच्या प्रचारात उतरल्याने   वातावरणाला आक्रमक वळण प्राप्त झाले आहे. बोदकुरवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभांमध्ये नागरिकांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. त्यांच्या नेतृत्वावर आणि विकासदृष्टिकोनावर असलेला विश्वास या उमेदवारांच्या ताकदीत मोठी भर घालणारा ठरत आहे.
           काही ठिकाणी तर सभांमध्ये एवढी गर्दी उसळली, नागरिकांनी ओसंडून उपस्थिती लावली. युवकांच्या घोषणांनी हवा थरथरली, महिलांची मोठ्या प्रमाणात झालेली उपस्थिती आणि स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांनी दिलेली ठोस आश्वासने यामुळे वातावरणात निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 
     नागरिकांचा सूर मात्र स्पष्ट—“या वेळी विजय बदलणार नाही, भेदोडकर–चापडेच!”

             या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या प्रचारयोजनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रभागातील वातावरण एकतर्फी होत चालल्याची कबुली अनेक राजकीय चर्चा वर्तुळांतून ऐकू येऊ लागली आहे.

        निवडणूक जवळ येत असताना भेदोडकर–चापडे यांचा प्रभाव झपाट्याने वाढत असून त्यांच्या विकासाच्या व्हिजनला प्रभागातील नागरिकांनी आधीच मंजुरी दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

       सध्या प्रभाग १३ मध्ये घुमणारा एकमेव आवाज असा

             —“भेदोडकर–चापडे : फिक्स नगरसेवक, विजय निश्चित!”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad