नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिसणाऱ्या हालचालींवरून हा प्रभाग भाजपाच्या दिशेने झुकल्याचे चित्र अधिक स्पष्ट होत आहे. भाजपाच्या उमेदवार वैशाली वातीले व लक्ष्मण उरकुडे यांच्या प्रचार मोहिमेला मिळणारा प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहता “कमळ” या प्रभागात अधिक बहरात फुलताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रभाग ३ मध्ये भाजपाच्या प्रचारात लक्षणीय आक्रमकता दिसून आली. महिलांच्या गटांचा मोठा सहभाग, युवकांची मोटारसायकल रॅली, तसेच घराघरातील संपर्क मोहिमेमुळे उमेदवारांच्या बाजूने वातावरण दृढ होत गेले. मतदारांमध्ये “विकासाला मत” आणि “स्थिर नेतृत्व” या मुद्द्यांवर चर्चा रंगताना दिसत आहे.
दरम्यान, विरोधकांचा प्रचार अद्याप प्रभावी वेग पकडत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत मतभेद आणि अपुरा जनसंपर्क यामुळे त्यांची बाजू कमकुवत होताना दिसते. याउलट, भाजपाच्या नियोजनबद्ध प्रचारयोजनांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वातीले–उरकुडे यांच्या बाजूने मतदारांचा कल अधिकाधिक स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधील सध्या दिसत असलेल्या राजकीय घडामोडी, रॅलीतील गर्दी, तरुणांचा ऊर्जावान सहभाग आणि नागरिकांनी दिलेली ग्वाही यावरून या प्रभागात भाजपाचे समीकरण जोरात बसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या