दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे पार पडलेल्या शिवराय चषक सिलम्बंब महाराष्ट्र स्टेट लेवल चॅम्पियनशिप 2025 या प्रतियोगितेमध्ये वणी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधील स्टिक रोलिंग, वेपॉन रोलिंग, स्टिक फाईट व डबल स्टिक सर्व प्रकारात युवा प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे यांच्या नेतृत्वामध्ये वणी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यश थाटे, नोक्ष थाटे, श्रावणी संदुरकर तसेच वैष्णवी सोनवाणे या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण तसेच रौप्यपदक मिळविले.
याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री ओमप्रकाशजी चचडा तसेच सदस्य श्री विक्रांतजी चचडा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री राकेश कुमार देशपांडे यांनी प्रशिक्षकांना सन्मानचिन्ह देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या