वणी :
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजुरकर यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या युवा पिढीशी नाते सांगत, “वाचनालय म्हणजे विचारांचा क्रांतिकारी दीपस्तंभ” असे मनोज्ञ भाषण केले. प्रमुख पाहुणे प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी फुले दांपत्याने समाजासाठी केलेल्या अमूल्य कार्याचा उल्लेख करून, “समता आणि शिक्षण हीच खरी प्रगतीची किल्ली” असा प्रेरक संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन व प्रभावी प्रास्ताविक प्रा. विजय बोबडे यांनी केले. समारोपात प्रा. अनिलकुमार टोंगे यांनी फुले दांपत्याच्या आदर्शांवर आधारित वाचनालयाच्या पुढील उपक्रमांची माहिती देत उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी, आजीवन सभासद व अभ्यासिकेचे संचालक भाऊसाहेब आसुटकर, प्रभाकरराव मोहितकर, कर्मचारीवर्ग तसेच अनेक अभ्यासक उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्ञानगाथा, प्रेरक भाषणे आणि महात्मा फुले यांच्या विचारांची उजळणी यामुळे सर्वांनाच नवीन उर्जा, आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. वाचनालयातून प्रसारित झालेली ही विचारज्योत उपस्थितांच्या मनामनात उजळून राहिली.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या