प्रभाग क्रमांक 13 मधील निवडणुकीची समीकरणे वेगाने बदलत असून, धर्मा कागडे व किरण ताई कुत्तरमारे यांच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेमुळे स्थानिक राजकारणात नवीनच हालचाली दिसू लागल्या आहेत. सभेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात स्पष्टपणे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सभेमध्ये शम सिद्धिकी, विनोदभाऊ मोहिकर, मुरलीधर कुत्तरमारे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती ठळकपणे जाणवली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या ऐकून त्यावर सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि त्यावर तत्पर प्रतिसाद यामुळे उमेदवारांविषयी लोकांचा विश्वास दृढ झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
तथापि, या संपूर्ण घडामोडीत प्रभागाचे समीकरण बदलवणारा घटक म्हणजे कुणाल चोरडिया यांचे नेतृत्व. त्यांच्या पाठिंब्यामुळे कागडे–कुत्तरमारे यांची बाजू अधिक मजबूत होत असून, संघटनशक्ती आणि रणनीती या दोन्ही पातळ्यांवर चोरडिया यांचे अस्तित्व विरोधकांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्यांच्या मैदानात उतरण्याने विरोधकांना स्पष्टपणे ‘धडकी’ बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या