Type Here to Get Search Results !

कुणाल चोरडियांची उपस्थिती ठरली गेमचेंजर ? प्रभाग ९ मध्ये राजकारण तापले

वणी : 

           शहरातील निवडणूक वातावरण तापत असताना आज प्रभाग क्रमांक ९ मध्ये झालेल्या कॉर्नर सभेमुळे राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण झाले. कुणाल चोरडिया यांनी स्वतः प्रचाराची धुरा हाती घेत आजच्या सभेला उपस्थित राहत प्रभागातील उमेदवारांच्या विजयासाठी नागरिकांना थेट आवाहन केले.

       कॉर्नर सभेला स्थानिक नागरिक, तरुण, महिला, ज्येष्ठ मंडळींची मोठी गर्दी उसळली होती. चोरडिया यांनी आपल्या भाषणात प्रभाग ९ मधील विकासकामांची गरज, नागरिकांच्या अडचणी आणि येणाऱ्या काळातील नियोजनाचा मुद्दाम उल्लेख केला.

          सभेत बोलताना त्यांनी सांगितले—

        “प्रभाग क्रमांक ९ नेहमीच बदलाची दिशा दाखवत आला आहे. यावेळीही तुम्हीच ठरवणार की विकासाच्या वाटेवर कोण चालेल. आमचे उमेदवार प्रामाणिकपणे काम करतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.”

            कुणाल चोरडिया यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारांमध्ये नवउमेद पाहायला मिळाली असून, या सभेनंतर प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

       नागरिकांशी संवाद साधताना चोरडिया यांनी घराघरांत पोहोचून मतदारांना विश्वास देण्याचे आवाहनही केले. प्रभाग ९ मधील ही सभा आगामी निवडणुकीतील समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते, अशी चर्चा नगरमध्ये सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad