‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५’ च्या निमित्ताने श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या वतीने दि. ५ ऑक्टोबर रोजी मुकुटबन येथे भव्य सदस्य मेळावा संपन्न झाला. सहकाराचे महत्त्व, संस्थेची प्रगती आणि सभासदांशी संवाद या उद्देशाने आयोजित मेळाव्यास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. देविदास काळे होते. उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी प्रस्तावना केली, तर प्रा. कवडूजी नगराळे यांनी “सहकारातून समृद्धी” या विषयावर मार्गदर्शन केले. उत्कृष्ट ठेवीदार, कर्जदार आणि अभिकर्त्यांचा सत्कार हा मेळाव्याचा विशेष भाग ठरला.
संचालक पुरुषोत्तम बद्दमवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर अध्यक्ष ॲड. काळे यांनी भविष्यातील विकासाचे ध्येय मांडले. कार्यक्रमाचे नियोजन सीईओ संजय दोरखंडे व शाखा व्यवस्थापक अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचालन पायल परांडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुरेश बरडे यांनी केले. हा मेळावा ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला बळ देणारा ठरला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या