आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांच्या वतीने मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रात भव्य सभासद मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सचिनकुमार कुलमेथे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय देरकर, अरुणाताई खंडाळकर, सुरेश इंगोले, वसंतराव आसुटकर, तसेच माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तांबेकर उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांनी “सहकारातूनच ग्रामीण भागाची आर्थिक समृद्धी साधता येते” असा संदेश दिला. संचालक अरविंद ठाकरे आणि उदय रायपुरे यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी तंत्रज्ञानाचा वापर व सभासदांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्ष ॲड. काळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्यातील योजना मांडल्या. मेळाव्यात कर्जदार, ठेवीदार, अभिकर्ते व संस्थेचे माजी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या