भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या मुख्य शाखेत ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदासजी काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताच्या सुरावटींनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, प्रमुख मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिक, ग्राहक आणि संस्थेचे सभासद यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
ॲड. देविदासजी काळे यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करताना देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, ग्राहकसेवा आणि समाजहित या मूल्यांवर संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या