Type Here to Get Search Results !

प्रभाग क्रमांक १० : काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या उपस्थितीने प्रचाराला मिळाली विशेष गती

वणी :

           वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारसभेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. प्रचारासाठी आमदार संजय देरकर, मनसे नेते राजू उंबरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्यासह विविध मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या संपूर्ण सभेच्या केंद्रस्थानी राहिले ते काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे.

               प्रचारात  घरोघरी भेटी देत असताना, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वशैलीला, स्थानिक प्रश्नांवरील त्यांच्या भक्कम भूमिकेला आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनाला विशेष दाद दिली. त्यांच्या संवादादरम्यान प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या अडचणी आणि आगामी विकास आराखड्याविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

         मित्रपक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला व्यापक पाठबळ मिळाले असले तरी, संजय खाडे यांच्या जोरकस वक्तृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या उत्साहवर्धक संदेशामुळे प्रचाराचे आकर्षण अधिक वाढले. नागरिकांनीही त्यांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले.

      प्रचाराची ही सभा प्रभाग क्रमांक १० मध्ये उमेदवारांना गतिमान बळ देणारी ठरली असून, येत्या टप्प्यात काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या पुढाकारामुळे प्रचार अधिक जोमदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad