वणी :
येथील संत जगनाडे चौकात संत जगनाडे महाराजांची जयंती विदर्भ तेली महासंघाद्वारे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तेली महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष रवी बेलुरकर हे होते. प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते गजानन कासावार, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष डंभारे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे हे उपस्थित होते.
या प्रसंगी समाज बांधवांनी संत जगनाडे महाराजांच्या कार्याला स्मरून त्यांच्या प्रतिमेला हरार्पन करण्यात आले. त्यानंतर कासावार यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर समाजबांधवांनी मार्गक्रमण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर अध्यक्षासह अतिथिनी समयोचित प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद तराळे. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय पिपराडे , देवेंद्र गोबाडे , शंकर पाटिल , गोपाल पाटील, पंढरी बोरपे, गजानन उपाते, विलास डवरे, आशिष डंभारे, प्रशांत निमकर, प्रणव पिंपळे, विलास निमकर, आकाश शिरसागर, संगिता सहारे, उमेश गंधारे, नथ्थूजी टाफरे, राहुल दांडेकर, वाघ साहेब, संकेत गंधारे, देवेंद्र डवरे यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या