येरंडेल तेली समाज संघर्ष बहुद्देशीय सामाजिक संस्था वणी यांच्या कार्यालयात संत परंपरेचे प्रतीक व कीर्तीशेखर श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करून पूजाविधी पार पडला. समाजबांधवांच्या उपस्थितीत संताजी महाराजांच्या कार्याची व समाजप्रबोधनातील योगदानाची उजळणी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शरद रा. तरारे, संजय शा. सहारे, सागर सु. समर्थ, लोकेश रा. तराळे, राहुल सु. कोलते, गणेश कावळे तसेच इतर येरंडेल तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन संजय शा. सहारे यांनी तर आभार प्रदर्शन सागर सु. समर्थ यांनी केले. समाज ऐक्य, सेवा आणि प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या