Type Here to Get Search Results !

२ डिसेंबर मतदान जवळ! भाजपची रणधुमाळी MAXIMUM SPEED वर!

वणी :
         २ डिसेंबरला मतदान आणि आता फक्त काहीच दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पार्टीने वणीतील राजकीय तापमान अक्षरशः उकळायला सुरुवात केली आहे! एस.बी. हॉल वणी येथे २५ नोव्हेंबर रोजी झालेली भाजपची आढावा बैठक शहरातील सर्व चर्चांचा केंद्रबिंदू ठरली.

📌 हॉल खचाखच भरून “भाजप मैदानात गंभीरपणे उतरलेय!” हे स्पष्ट

           बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले मा. हंसराज भैय्या अहिर – अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, उपस्थित मान्यवर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा पदाधिकारी आणि मोठा कार्यकर्ता वर्ग तसेच सभेला  व्यापारी, डॉक्टर, सीए, प्राध्यापक, शिक्षक, मान्यवर व्यक्ती, प्रभावशाली चेहरे यांची दिमाखदार उपस्थिती होती.

📌  राजकीय फटका : “२ डिसेंबरला वणीचा फैसला… विकास की ठप्पपणा?”

         बैठकीत भाजप नेत्यांची भाषा सपशेल आक्रमक, अपूर्ण वचनांचे ढिगारे, विकासाची अडचण, भ्रष्टाचाराचे सावट, यावर त्यांनी थेट प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य केले.
“आता वेळ नाही—थेट मतदानाचा मोर्चा!
       २ डिसेंबरला वणीकर विकासाच्या बाजूने मतदान करतील!” असा ठाम संदेश देत भाजपने शक्तिप्रदर्शनाचा सूर आणखी तीक्ष्ण केला.

📌 संकल्पपत्र जाहीर – ‘विकासाचा शर्ट, वचन नाही थेट ACTION!’


        भाजपचे संकल्पपत्र म्हणजे वणीकरांसाठी विकासाची थेट हमी- स्वच्छ, प्रकाशमान वणी,  स्मार्ट डिजिटल प्रशासन, व्यापार वाढीसाठी सुलभ धोरणे, स्त्रीसुरक्षेसाठी विशेष उपाय, तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि बरच.. संकल्पपत्र जाहीर होताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू


📌 निवडणुकीची रणधुमाळी : काउंटडाउन सुरू!

                  २ डिसेंबरला मतदान आणि वणीतील लढत तुफान तापलेली भाजपने आजच्या बैठकीतून स्पष्ट संदेश दिला— ‘ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढत आहोत!’”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad