Type Here to Get Search Results !

वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

वणी : 

           प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात होताच वणी शहरात आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, वणी (जि. यवतमाळ) तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.


        ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. संजीवरेड्डी बा. बोदकुरवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की,


     “अंध:कारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. समाजातील प्रत्येक घटकाने एकतेचा व मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवावा, हीच खरी दीपावलीची भावना आहे.”


           वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या वणी लायन्स इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा आपली ५० वर्षांची सोनरी आणि यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांची परंपरा जपत संस्थेने वणीसह परिसरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.


           संस्थेच्या सर्व संचालक मंडळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागरिकांना शुभेच्छा देताना अध्यक्ष बोदकुरवार म्हणाले की,


              “दीपावलीचा हा सण सर्वांच्या जीवनात प्रकाश, प्रेरणा आणि नवनिर्मितीची ऊर्जा घेऊन येवो, हीच आमची शुभेच्छा.”


              ५० वर्षांची सोनरी वाटचाल – शिक्षण व सेवाभावाची परंपरा कायम राखत वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टकडून सर्वांना शुभ दीपावली!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad