Type Here to Get Search Results !

“भाकपला विजय मिळाला तर जनतेच्या हिताच्या योजना जिल्हा परिषदेतून खेचून आणू” — कॉ. झाडे

 वणी  :

             नागपूर येथे पार पडलेल्या शेतकरी एल्गार मोर्चाला घोंसा-वागदरा जिल्हा परिषद क्षेत्रातून शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मित्रपक्षांचे जिल्हा परिषद उमेदवार कॉम्रेड सुहास झाडे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले.

        मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य किसान सभेने तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन उभे राहील, असा ठाम इशारा कॉ. झाडे यांनी दिला.

         शिवाजी महाराज चौकात झालेल्या एल्गार मोर्चा प्रदर्शनात बोलताना कॉ. झाडे म्हणाले,
                           “सरकारने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा केला नाही, तर किसान सभा राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. घोंसा-वागदरा गटात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाल झेंडा कायम संघर्ष करत राहील.” ते पुढे म्हणाले की, “भाकपला या गटात विजय मिळाल्यास, जिल्हा परिषदेतून सर्व प्रकारच्या योजना जनतेच्या हितासाठी खेचून आणू,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

                एल्गार मोर्चास पाठींबा देण्यासाठी निलेश झाडे, रविंद्र ढेंगळे, नितीन ढेंगळे, वसंता पानघाटे, मारोती दरेकार, अमोल वाभीटकर, प्रमोद गाढवे, दयानंद गोरे, प्रविण झाडे, ज्ञानेश्वर झाडे, गुलाब डाहुले, योगेश झाडे, गजानन बोधाने, ईश्वर मुसळे, रमेश विधाते, रूपेश झाडे आदींसह घोंसा-बोर्डा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad