प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातील कातकडे परिवाराने सर्व जनतेस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीमती सुलोचनाताई कातकडे, माजी संचालिका — कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी, यांनी या निमित्ताने नागरिकांना संदेश दिला की,
“दिवाळीचा सण हा अंधारावर प्रकाशाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय साजरा करणारा सण आहे. या सणाने प्रत्येक घरात सुख, शांती आणि समाधान नांदो.”
यावेळी श्री. सुनील कातकडे, वणी विधानसभा प्रमुख व उपसरपंच, ग्रामपंचायत चिखलगाव, यांनी सांगितले की —
“एकमेकांप्रती प्रेम, ऐक्य आणि सहकार्याची भावना जोपासून दिवाळी साजरी केली पाहिजे. सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी हा सण प्रेरणादायी ठरतो.”
सौ. रुपाली सुनील कातकडे, सरपंच ग्रा.पं. चिखलगाव यांनी
"महिलांनी स्वावलंबन आणि समाजहितासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले."
कातकडे परिवाराच्या वतीने वणी आणि परिसरातील सर्व नागरिकांना “दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”
“प्रकाशाच्या या पर्वाने सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य व समृद्धीचा प्रकाश पसरावा, हिच दिवाळीची खरी ओळख आहे.” — कातकडे परिवार


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या