राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या कामगार आघाडीच्या झरी-जामणी तालुकाध्यक्षपदी मुकुटबन येथील श्री. किशोर अंकुलु गोंलावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष (कामगार आघाडी) आबिद हुसेन यांच्या स्वाक्षरीने प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण यांचे हस्ते करण्यात आली. या प्रसंगी वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
किशोर गोंलावार यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, पक्षाची विचारधारा झरी-जामणी तालुक्यातील प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवून संघटन अधिक बळकट करण्याचे कार्य ते प्रामाणिकपणे करतील.
तर दिलीप भोयर यांनी या नियुक्तीबाबत बोलताना म्हटले की, गोंलावार यांच्या कार्यतत्परतेचा, समाजसेवेतील सहभागाचा आणि पक्षनिष्ठेचा गौरव म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नवीन तालुकाध्यक्षांचे पक्षाचा दुपट्टा देऊन अभिनंदन केले आणि भविष्यात पक्षाच्या धोरणांना बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या