निलजई-बेलोरा-तरोडा परिसरातील जीआरएन कंपनीत शिवसेना (उबाठा) प्रणीत कामगार सेनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. आ. संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी जाहीर झाली. रमेश भादीकर अध्यक्ष, संजय जांभुळकर सचिव, संदीप ढोके उपाध्यक्ष, युगल घिमे कोषाध्यक्ष, सूरज सातनकर व राजू भोगेकर सहसचिव, तर महेंद्र राखुंडे संघटक म्हणून निवडले गेले.
या वेळी आ. संजय देरकर यांनी कामगारांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करत “कामगारांचे संघटनच त्यांच्या हक्कांसाठी लढ्याचे बलस्थान आहे,” असे सांगितले. कार्यक्रमात संजय निखाडे, संतोष कुचनकर, शरद ठाकरे, लेकेश्वर बोबडे, टिकाराम खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास कंपनीतील शेकडो कामगारांनी उपस्थित राहून कामगार सेनेत प्रवेश केला. या कार्यकारिणीमुळे परिसरातील कामगार चळवळीला नवे बळ मिळाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या