Type Here to Get Search Results !

‘ती सापडली!’ — पण तिच्या डोळ्यातलं मौन सांगून गेलं भयावह सत्य!


 मारेगाव :

             माणुसकीला काळीमा फासणारी आणि जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना पांढरदेवीच्या प्रसिद्ध जत्रेत घडली आहे. १४ वर्षांच्या चिमुकलीवर एका विकृत नराधमाने जंगलात नेऊन अमानुष अत्याचार केला! ही घटना समजताच संपूर्ण परिसरात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.

                दिवाळीत गाई-गोधनाच्या दिवशी मारेगाव तालुक्यातील पवित्र हेमाडपंथी पांढरदेवी मंदिरात मोठी जत्रा भरते. दर्शनासाठी पांढरदेवी मंदिरात जत्रा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळलेली असते. या गर्दीत आपल्या मैत्रिणींसोबत आलेली १४ वर्षीय चिमुकली चुकून वेगळी पडली. याच क्षणाचा फायदा घेत एका व्यक्तीने तिला जंगलात ओढत नेले.

                 मंदिराच्या परिसरातील विहिरीजवळ या नराधमाने त्या निरपराध मुलीवर अत्याचार केला. भय, वेदना आणि अश्रूंत भिजलेली ती चिमुकली कसाबसा तिथून बाहेर आली आणि आपल्या नातेवाईकांकडे धावत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांकडे धाव घेतली.

                          मारेगाव पोलिसांनीही विलंब न लावता तात्काळ पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. आणि अवघ्या काही तासांत कैलास सूर्यभान आत्राम (वय २८ ) या नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले! आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ६४, ९६ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

                     मात्र या घटनेने समाजमन संतापून उठले आहे. मंदिरासारख्या पवित्र स्थळी असा अमानुष प्रकार घडणे ही संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद बाब असल्याचे नागरिक सांगत आहेत. पांढरदेवीसारख्या पवित्र भूमीत घडलेला हा पापी प्रकार जिल्ह्याच्या अंत:करणाला भिडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad