Type Here to Get Search Results !

दोन दिवस सावध राहा! आभाळ रुसलंय, हवामान खात्याचा अलर्ट

वणी :

          विदर्भात पुन्हा एकदा आभाळ रुसलं आहे! मौसम विभाग, नागपूर यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सावधतेचा इशारा दिला आहे. २८ ऑक्टोबरला येलो अलर्ट तर २९ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

          या दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी तातडीने सूचना प्रसिद्ध केल्या असून, “नागरिकांनी बेफिकीरपणे बाहेर पडू नये, विजेपासून व वादळी वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करावा,” असा कडक इशारा दिला आहे.

📌 प्रशासनाचा जनतेला इशारा :

                  विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका! सुरक्षित स्थळी त्वरित आसरा घ्या. नदी-नाल्यांवर पाणी वाहत असेल तर जीव धोक्यात घालू नका. दुचाकी, चारचाकी किंवा बैलगाडीतून जाणे टाळा. धरण परिसर, पर्यटन स्थळांवर जाऊन सेल्फी काढणे किंवा रिल बनवणे जीवावर बेतू शकते — टाळा!

             सर्व तहसीलदारांना आदेश – २४x७ नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून आपत्ती व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवा!

             जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत की, काढणी झालेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत. वादळी वारा, विजांचा कडकडाट किंवा मुसळधार पावसामुळे होणारी हानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असा पुन्हा इशारा देण्यात आला आहे.

              आता पाहायचं इतकंच – प्रशासनाचा इशारा नागरिक कितपत गांभीर्याने घेतात! आभाळात विजा तडतडतायत, आणि धोका फक्त पावसाचा नाही – निष्काळजीपणाचाही आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad