चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौ. प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
त्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या की, "अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा जयघोष करणारा सण म्हणजे दीपावली. या पवित्र सणाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्य लाभो. आपल्या कुटुंबात प्रेम, ऐक्य आणि सौहार्दाचे दीप उजळत राहोत, अशी मी सर्वांना शुभेच्छा देते."
खासदार धानोरकर यांनी पुढे सांगितले की, "आपला प्रदेश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. हा विकासाचा प्रवास जनतेच्या आशीर्वादाने आणि सहभागानेच यशस्वी होईल. चला, या दीपोत्सवात आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊ आणि सामाजिक ऐक्याची नवी ज्योत प्रज्वलित करूया."
दीपावलीच्या या सणानिमित्त त्यांच्या शुभेच्छा संदेशामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या