दिवाळीचा सण देशभरात जल्लोषात साजरा होत असताना, विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार दाटलेला आहे. अतिवृष्टी, पूर आणि पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला सरकारने अक्षरशः विसरल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वणी शहरातील शिवाजी चौकात "काळी दिवाळी शिदोरी आंदोलन" उभारून शासनाविरुद्ध तीव्र हल्लाबोल केला.
“सरकार झोपेत आहे, आणि शेतकरी थडग्यात जातोय!” अशा संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवसैनिकांनी दिवाळीच्या पारंपरिक ऐवजी चटणी-भाकर खाऊन निषेध नोंदवला, शासनाचा निषेध करत बळीराजाच्यावेदनांना आवाज दिला.
आंदोलनादरम्यान आमदार संजय देरकर यांनी स्पष्ट मागणी केली —
- राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा!
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा!
- प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ₹५०,००० अनुदान द्या!
आमदार संजय देरकर यांनी इशारा दिला की, जर सरकारने आत्ताच शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले नाहीत, तर आगामी काळात शिवसेना रस्त्यावर उतरून राज्य हलवेल.
या आक्रमक आंदोलनात जिल्हाप्रमुख संजयभाऊ निखाडे, जिल्हा संघटक गणपतजी लेडांगे, जिल्हा समन्वयक सुधीरजी थेरे, विधानसभा प्रमुख सुनीलजी काकडे, वणी तालुकाप्रमुख संतोषजी कुचनकार, मारेगाव तालुकाप्रमुख पुरुषोत्तमभाऊ बुट्टे, उपजिल्हाप्रमुख दीपकजी कोकास, जिल्हा संघटिका सौ. डिमनताई टोंगे, तसेच विनोदजी दुमणे, शरदजी ठाकरे, राजूजी तूरनकर, लोकेश्वरजी बोबडे, संजयजी देठे, प्रकाशजी खरात, रविकांतजी जयस्वाल, ढेंगळे गुरुजी, दिवाकरजी भोंगळे, सतीशजी वहऱ्हाटे यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्यांनी गर्जना केली —
“ही फक्त शिदोरी नाही, हा इशारा आहे!
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी झोपेतले सरकार जागे झालं नाही, तर शिवसेनेचा लढा रस्त्यांपासून मंत्रालयाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचेल!”


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या