Type Here to Get Search Results !

सकाळी शांत वाटणाऱ्या वणीला धक्का; चाकू आणि धमक्यांसह महिला छळली

वणी : 

           भालर रोडवर घडलेली धक्कादायक घटना वणीतील नागरिकांमध्ये भिती निर्माण करत आहे. एका 34 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्यावर आरोपी सुनिल भाऊराव मोहीतकर (वय 55) यांनी थेट जीवनाला धोका पोहोचवणारा छळ केला.


          फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा सतत पाठलाग केला, मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.


          घटना अशी घडली की, महिला स्कुटरवर भालर रोडने जात असताना आरोपी तिच्या स्कुटरसमोर येऊन त्याच्या कारने पाठलाग करत तिला अडवले. आरोपी कारच्या बाहेर येऊन तिला जबरदस्तीने स्वतःच्या कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. महिला विरोध करत असताना आरोपीने चाकू काढून तिच्या मानेला धरले आणि धमकी दिली: “बस नाहीतर मारून टाकेन!”


          या गंभीर घटनेवर वणी पोलीस स्टेशनमध्ये कलम 74, 75, 78, 87, 296, 352, 351(2), 351(3) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला कोर्टात पेश करण्यात आले असता एमसीआर झाला आहे.


          पोलीस तपास सुरु असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वणीतील रहिवासी या प्रकारावर चिंता व्यक्त करत आहेत आणि महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad