वणीतील समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सागर मुने आता राजकारणात पदार्पण करण्याच्या मार्गावर आहेत. घरापासून झाडे लावण्यापासून सुरू झालेल्या सेवाभावी प्रवासाने आता शहरभर चर्चेला उधाण आणले आहे. झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ करणे, साई मंदिर ते बस स्थानक रस्ता साफसफाई, नगरसेवा समिती स्थापन करुन सामाजिक कार्याचा गाभा तयार करणे – यामुळे त्यांचे नाव जनतेमध्ये विशेष रुचले आहे.
उच्च शिक्षण, पत्रकारिता, नाट्य, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध स्पर्धांमध्ये सहभाग – या सर्व गुणांनी सागर मुने यांना एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बनवले आहे. सर्व राजकीय पक्षांशी व्यक्तिगत संबंध असल्यामुळे आता चर्चेचा विषय उभा आहे: कोणता पक्ष त्यांना स्वतःकडे ओढेल?
२०२४ मध्ये भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करून त्यांनी समाजसेवेत आपली छाप स्पष्ट केली आहे. मदतीसाठी नेहमी तत्पर, निस्वार्थी सागर मुने यांचा जनतेमध्ये मोठा लौकिक आहे. आता सर्वांची नजर त्यांच्यावर आहे – स्वतंत्र निवडणूक लढवणार की प्रमुख राजकीय पक्षातून प्रवेश करणार?
सागर मुने यांचा राजकारणातील प्रवास फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित राहणार नाही; वणी शहराच्या विकासासाठी नवे अध्याय लिहिण्याची अपेक्षा समाजात आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या