Type Here to Get Search Results !

वणीच्या राजकारणात भूचाल — विजय चोरडिया ‘शिंदेसेने’त!

वणी : 

             वणीच्या राजकारणात आज जनतेच्या चर्चेचा विषय एकच “चोरडिया गेले शिंदेकडे” भाजपच्या तळागाळापासून ते नेतृत्वापर्यंत खळबळ उडवणाऱ्या या हालचालीने शिंदे गटाचा आत्मविश्वास आकाशाला भिडला आहे. 

                 तालुक्यातील राजकारण आज अक्षरशः हादरलं! भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि समाजसेवक विजय चोरडिया यांनी आज शिवसेना (शिंदे गटात) अधिकृत प्रवेश करत वणीतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे, तर शिंदे गटाचा आत्मविश्वास आकाशाला भिडला आहे. 

             विजय चोरडिया यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव गावंडे आणि मंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे गटासाठी हा “मोठा राजकीय किल्ला” जिंकण्याचा क्षण ठरला. चोरडिया यांच्यासोबत आशिष काळे आणि राहुल मुंजेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत झेंडा फडकवला आहे. यावेळी शिवराज पेचे, अनिल ढगे, आणि चंद्रकांत घुगुल यांसारखे स्थानिक नेते उपस्थित होते.

               राजकीय विश्लेषकांच्या मते, वणीतील हा घडामोडींचा ‘टर्निंग पॉइंट’ असून भाजपला मोठी फट बसली आहे. शिवसेना शिंदे गटाची पकड आता अधिक मजबूत होत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.

                  वणीचे राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे आणि या भूकंपानंतर कोणाचे राजकीय भवितव्य उलटते, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad