Type Here to Get Search Results !

“वणीकरांनो, जागे व्हा! तुमचं नाव मतदार यादीत नाही ? आत्ताच हरकत नोंदवा!”

वणी :

             वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रभागानिहाय प्रारुप मतदार यादी   दि. ८ ऑक्टोबर २०२५  नगर परिषद मुख्य कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयात ठेवण्यात आली असून, नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

                  नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येक मतदार आपले नाव, मतदार माहिती आणि प्रभाग तपासावे. या प्रक्रियेमुळे निवडणुकीतील चुका टाळता येतील आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होईल.

                    प्रारुप मतदार यादीवर आक्षेप, सूचना किंवा हरकती असलेल्या नागरिकांनी ८ ते १३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान लेखी स्वरूपात आपली तक्रार वणी नगर परिषद कार्यालयात सादर करावी. कार्यालयीन वेळेत नागरिकांना ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

                मुख्य अधिकारी, नगर परिषद वणी यांनी नागरिकांना सूचित केले की, मतदार नोंदणी तपासणे हे केवळ औपचारिकता नाही, तर मतदान हक्क सुरक्षित करण्याचा महत्वाचा भाग आहे. यादीतील चुकीच्या नोंदी दुरुस्त करून सर्व नागरिक निवडणूक प्रक्रियेत सुचारूपणे सहभागी होऊ शकतील.

                   नगर परिषद प्रशासनाने सर्व नागरिकांना वेळेत यादी तपासण्याचे आणि आवश्यक आक्षेप व हरकती सादर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आगामी निवडणूक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि सर्वसमावेशक होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad