Type Here to Get Search Results !

अंधश्रद्धा तोडा, शिक्षण स्वीकारा!” — जैन लेआऊटमध्ये राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली

 वणी : 

          समाजाला अंधश्रद्धा व जातीभेदातून मुक्त करून शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे ग्रामविकासाचे जनक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जैन लेआऊट येथे भावपूर्ण मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीसोबत विचारजागृतीचे सूर घुमले आणि राष्ट्रसंतांचे ‘कृतीतून कर्मयोग’ तत्वज्ञान जनमानसात रुजले.

            रविवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन मिनिटांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी सामुदायिक ध्यान, प्रार्थना, सत्संग, भजन, सामूहिक हनुमानचालीसा व विश्वशांतीसाठी संकल्प असे विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम पार पडले.

       ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांवर चिंतन करत सांगितले की, “ग्रामगीता आणि राष्ट्रसंतांचे तत्वज्ञान हे केवळ ग्रंथापुरते नव्हे, तर जीवन जगण्याचे मार्गदर्शन आहे. प्रत्येकाने ते कृतीत उतरवणे हाच खरा श्रद्धांजलीचा अर्थ आहे.”

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना बदखल यांनी केले, तर प्रास्ताविक अरुण चटप यांनी सादर केले. यशस्वी आयोजनासाठी नामदेव तुरणकर, अशोक भोयर, जनार्दन भोंगळे, वसंत ठेंगणे, देवीलाल मेहता, मनोज, ओमकार तुराणकर, वैभव करडभुजे, शत्रूघन मालेकर, श्रीजीत भोयर, रवी नागपुरे, छाया बदखल, शोभा तुराणकर, पुष्पा दुर्गे, झाडेताई, भोयरताई, विना धानोरकर आदींनी परिश्रम घेतले.

               कार्यक्रमातून स्पष्ट संदेश देण्यात आला —

        “शिक्षण हाच धर्म, ग्रामसेवा हाच पूजाअर्चा, आणि समाजजागृती हाच खरा श्रद्धांजलीचा मार्ग!”

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad