नरसाळा (ता. मारेगाव) :
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, नरसाळा येथे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी निमित्त आकाशकंदील स्पर्धा व रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला पंचायत समिती मारेगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री. देउळकर साहेब व केंद्रप्रमुख वगरे मॅडम मारेगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय ढवस सर, तसेच सन्माननीय गायकवाड सर, सन्माननीय ससाणे सर, सन्माननीय पाटणकर सर, सन्माननीय उईके सर, ठक मॅडम व कोल्हे मॅडम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील व सुंदर रांगोळ्यांच्या माध्यमातून आपली सृजनशीलता सादर केली.
स्पर्धेतील विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, स्पर्धात्मकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मुख्याध्यापक ढवस सर यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या