प्रतिनिधी/ वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा विभागातर्फे आयोजित 'The SOCH – विचार विवेकाचा, ध्यास परिवर्तनाचा' ही राज्यव्यापी विशेष युवा छावणी दि. ९ ते ११ मे, २०२५ दरम्यान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर जवळील मैत्री हिल्स या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. हे छावणीचे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून यासाठी पूर्व नोंदणी सुरू आहे. छावणीत सहभागी युवांची मर्यादित संख्या असणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. १ मे २०२५ पूर्वी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या युवा छावणी चे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी, लेखक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अरविंद जगताप यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, प्रा. राम पुनियानी, मिलिंद चव्हाण, मुक्ता चैतन्य, डॉ. अनिल डोंगरे, डॉ. नितीन शिंदे, विनायक सावळे, आरती नाईक, राजवैभव , हिना कौसर खान असे मान्यवर युवांशी संवाद साधतील. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित विविध विषय मांडणीची सत्रे, अनुभवावर आधारित शिक्षण आणि कृतीशील संवाद, खेळ, गाणी होणार आहेत. हे शिबिर तरुणांना विवेकशील समाज निर्मितीच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण विचारपीठ ठरणार आहे.
संपर्क :
राज्य युवा कार्यवाह प्रियांका खेडेकर - 8652617382
विदर्भ विभाग : मंगेश – 7083497800,
मराठवाडा विभाग : तुळशीदास – 8888004097,
खानदेश विभाग : कल्पेश – 9763928011,
पश्चिम महाराष्ट्र विभाग : रतन – 7774895842,
कोकण विभाग : तेजल – 8652200724
या शिबिरात सहभागी होऊन विवेकशील समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आयोजकांचे वतीने आवाहन आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या