वणी :
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणी मारेगांव झरी तालुक्यातील समितीच्या कार्यकर्त्याना तथा विदर्भ प्रेमी जनतेला कळविण्यात येते की, समितीच्या वतीने वणी येथे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून या दिनाचा निषेध करण्यासाठी वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे.
केंद्र सरकारने विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करावे, शेतकर्यांची संपुर्ण कर्ज मुक्ती करावी, अन्नधान्याची व जी.एस.टी. तात्काळ रद्द करावी यासह विविध मागण्यासाठी समिती आग्रहक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दिनावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र दिन हा आमच्या साठी काळा दिन आहे, त्यावर आम्ही बहीष्कार टाकत आहोत.
१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्या दिवसापासून संपन्न विदर्भ प्रदेशाची लुट सुरु झाली. पश्चिम महाराष्टाच्या नेत्यांनी विदर्भातील खनिज, कोळसा, वीज, वनसंपदा शेतमाल याचे शोषण सुरु केले. मागील ५०-६० वर्षात महाराष्ट्राला भिकार अवस्थेत आणून ठेवले आहे. त्यामुळे १ मे महाराष्ट दिन विदर्भाचा काळा दिवस ठरला.
महाराष्ट दिनाचा निषेध करण्यासाठी आपण १ मे २०२५ रोज गुरुवारचा वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या