प्रतिनिधी / नागपुर (मंगेश राऊत) :
तुलसीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर (TGPCET) येथील NBA मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाने दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी TECHSPARK-2k25 हा राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला. या कार्यक्रमाला विदर्भातील विविध महाविद्यालयामधून 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांनी आपले तांत्रिक कौशल्य व नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि प्रमुख पाहुणे श्री. प्रविण चिकणकर, व्यवस्थापकीय संचालक, M/S Solar4all आणि आकृती पॉवर इंजिनियर्स, यांच्या प्रेरणादायी भाषणाने उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवोन्मेष, तंत्रज्ञान व उज्वल भविष्याच्या कल्पनांचा उत्सव साजरा करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या दिशेने विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
प्रकल्प स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि पॉवर पॉईंट सादरीकरण या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आपली सर्जनशीलता व्यक्त करण्याचे व्यासपीठ मिळाले. विद्यार्थ्यांनी भविष्यातील तांत्रिक प्रगतीची उत्कृष्ट मांडणी करत आपल्या संकल्पनांद्वारे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील परिवर्तनात्मक क्षमतांचा परिचय दिला.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात प्रा. वंदना खंते, प्राचार्य, टी.जी.पी.सी.ए. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले, तर इतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ. मोहन गायकवाड-पाटील, अध्यक्ष, GPG, मा. श्री. आकाश गायकवाड-पाटील, उपाध्यक्ष, GPG, मा. डॉ. संदीप गायकवाड, कोषाध्यक्ष, GPGI, मा. डॉ. पी. एल. नाकतोडे, प्राचार्य, TGPCET, मा. डॉ. प्रगती पाटील, उपप्राचार्या, TGPCET आणि प्रा. गणेश वकते, प्रमुख, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे यशस्वीरीत्या पार पडले.
प्रा. प्रितेश म्हैसकर आणि प्रा. प्रफुल घाडगे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून उत्कृष्ट नियोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या