महाराष्ट्रात आतापर्यंत पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अकोला, मुंबई,पुणे आदी ठिकाणी हत्या करून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात रक्कम हडपल्यागेली मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५वर्षाच्या बुवा बाबा यांना पकडले. त्यात नागपूर येथे घडलेली संपुर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, जिथे मा मुख्यमंत्री, गृहमंत्री, वजनदार मंत्री,केन्द्रिय मंत्री आर.एस.एस.चे मुख्यालय अनेक प्रबोधन चळवळीचे केंद्र असलेल्या नागपूर येथे हि घटना घडली येथील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत अब्दुल कादीर कुरैशी उर्फ कुणाल मदने या ढोंगी बाबाने पैशाचा पाऊस पाडून पैसे मिळवून देतो. असे सांगून तिन अल्पवयीन मुलींना नग्न करून पुजेच्या नावाखाली त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले, मात्र या बाबांसह ईतर चार आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि, इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013 अनुसुचि कलम 2(१)( ख) अन्तर्गत गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी पूर्ण करून हि दुर्मिळ असलेली केस जलद गती न्यायालयात चालवून कडक शिक्षा व्हावी. यासाठी प्रयत्न करावे यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी नागपूर येथे मा पोलिस आयुक्त नागपूर परिक्षेत्र, मा.डि.सी.पी.झोन-२ तसेच मानकापूर पोलिस स्टेशन अधिकारी यांना दि २५ एप्रिल ला निवेदन देवून चर्चा केली.
कुणाल मदने या ने मुस्लिम धर्म स्वीकारून अब्दुल कादीर कुरैशी असे नाव धारण करून भोंदूगिरी सुरू केली. त्याचा जाळ्यात आशू कोचे व त्यांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेली गायत्री नावाची महिला जाळ्यात अडकली. या बाबाने या दोघांना पैशाचा पाऊस पाडून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तिन अल्पवयीन मुलींची नग्न पुजा करण्यासाठी मिळवावी लागेल,अशी बतावणी केली. मात्र आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुजा करून मंत्राने पैशाचा पाऊस कसा पडू शकतो असा थोडाही विवेकाने विचार न करता मुली मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी ओळखिच्या दोन मुलांना हाताशी धरून या तरूणांना पैशाचे आमिष दाखविले, त्यांनी गरीब असलेल्या तिन मुलिंना पैशाचा लोभ दाखवून या नग्न पुजे करता तयार केले. अब्दुल करीम कुरेशी या ढोंगी बाबाच्या घरी रात्रीला नेले. एका खोलीत सर्व एकत्र येऊन या ढोंगी बाबाने उपस्थित महिला व या तिन मुलिंना पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नग्न होण्याची सुचना केली. त्याला महिलांनी विरोध केला तर या तिन अल्पवयीन मुलींनी होकार देवुन त्या नग्न झाल्या बाबाने त्यांची नग्न पुजा केली. त्यांचा छातीला लिंबू चोळले व आता पैशाचा पाऊस पडेल असे सांगून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पैशाचा पाऊस तर पडलाच नाही कारण तो कधीही पडूच शकत नाही. कारण नोटा फक्त नाशिक येथील सरकारी छापखान्यातच छापल्या जातात, यानंतर पैशाच्या देवाण घेवाण वरून बाबा व गायत्री या महिलेमध्ये वाद झाला. या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची तक्रार तिने मानकापूर पोलिस स्टेशन येथे केली तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास वेगाने करून बाबाला अटक केली. तपासात आशू कोचे त्याची साथी गायत्री हिचा सहभाग दिसताच, त्यांनाही अटक केली. तर पुढील तपासात दोन मुलांचा सहभाग लक्षात येताच त्यांनाही अटक करून पोक्सोसह विविध गुन्हे या सर्वांवर दाखल करून २५ एप्रिल पर्यंत पी.सि.आर.मिळविला. यांची पाळेमुळे अधिक दुरवर असल्याचा संशय व हे मोठे रॅकेट असू शकते. त्यामुळे काल त्यांना कोर्टासमोर पेश करून २९ एप्रिल पर्यंत पि.सि.आर.मिळविला.
मात्र या सर्वावर जादुटोणा विरोधी कायदा दाखल केला नाही. हि बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आली असता. त्यांनी तातडीने याची दखल घेत राज्य सरचिटणीस संजय शेंडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णू लोणारे, भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे नागपूर यांना सोबत घेऊन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याच्या कायदे विभागाच्या ॲड तृप्ती पाटील, मुंबई, ॲड रंजना गवांदे नगर यांचे मार्गदर्शन फोन वरून मिळवून मा पोलिस आयुक्त नागपूर परिक्षेत्र,मा राहूल मदने डि.सि.पी.झोन-२ नागपूर मा कळसकर पोलिस स्टेशन अधिकारी मानकापूर यांची भेट घेऊन चर्चा केली. या सर्वांवर जादुटोणा विरोधी कायदा दाखल करावा यासोबतच पुरक असलेले गुन्हे दाखल करून या घटनेच्या खोलवर जाऊन शोध घ्यावा. हि केस जलदगती न्यायालयात चालवून कडक शिक्षा व्हावी. यासाठी योग्य तो तपास करावा प्रत्येक पोलिस स्टेशन मध्ये मा छेजिंग दोरजे पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या २०१६ च्या आदेशानुसार अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापित करून अशा घटनांना आळा घालावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या