वणी :
तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे आकर्षण वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस व पोलीस स्टेशन वणीच्या सौजन्याने एसडीपीओ सुरेश दळवे व ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे निबंध स्पर्धा व ड्रग फ्री यूथ, से नो टू ड्रग या विषयावर विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. निबंध स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका चौधरी, शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सदस्य महेंद्र श्रीवास्तव, अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रियांका चौधरी यांनी दैनंदिन जीवनात लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. त्याबद्दल त्यांना आकर्षण वाटते व त्यातूनच चहा पिणे, मोबाईल वापरणे इत्यादी सवयी व्यसन बनते तसेच अंमली पदार्थांचे बाबतीत होते असे सांगून मादक द्रव्ये व अंमली पदार्थांच्या सेवनाने अनमोल अशा मानवी जीवनाची दुर्दशा होते म्हणून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या बाबत जागरुक राहावे असे आवाहन केले.
श्री किरण बुजोने यांनी मार्गदर्शन शिबिराचे संचालन करून आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या